सामान्य प्रशासन


सामान्य प्रशासन विभाग – संक्षिप्त माहिती
विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम गट विकास अधिकारी (उ.श्रे.)
खाते प्रमुखाचे नाव श्री. प्रवीण अण्णासाहेब सिनारे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक ८९८३०२४७५०
विभागाचा ईमेल
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :-

आस्थापना विषयक कामकाज उदा.नियुक्ती, पदोन्नती, बदली, रजा इ. सर्व पंचायत समिती कर्मचा-यांबाबत
निवड मंडळाचे कामकाज
नियोजन व समन्वय
प्रशिक्षण
राज शिष्टाचार
वार्षिक प्रशासन अहवाल
पंचायत समिती सर्वसाधारण व स्थायी समिती सभा कामकाज

सामान्य प्रशासन विभाग – खात्या विषयी
सा.प्र.विभागात पं.स.मधे आलेल्या व पं.स.मधून पाठीलेल्या सर्व पत्रांची नोंद ठेवण्यात येते.पं.स.मधील सर्व खातेप्रमुखांनी/खात्यांनी केलेल्या कामकाजाचा अहवाल एकत्रित करून जि.प.ला सादर करण्यात येतो. पं.स.च्या एकंदरीत कामकाजाचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून पं.स.च्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येतो.पं.स. मधील सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तके व इतर सेवा विषयक नोंदी ठेवण्यात येतात.जि.प. व पं.स.च्या समाजकल्याण व महिलाबालकल्याण विभागातील योजनांच्या साहित्याचे वाटप या विभागातून करण्यात येते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन अदा करणे व इतर नोंदी ठेवण्यात येतात.पं.स. च्या कार्यकारी मंडळाच्या मासिक सभांचे इतिवृत्त ठेवण्यात येते.