आरोग्य

आरोग्य विभाग – संक्षिप्त माहिती
विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम तालुका आरोग्य अधिकारी
खाते प्रमुखाचे नाव श्री. डॉ. मोहन शिंदे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक ९४२२९४०००७

विभागाचा ईमेल
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :-

ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य विषयक सेवा पुरविणे.
शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे.
लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने निरनिराळ्या योजनांची अंमलबजावणी करणे व तसेच माता व अर्भक मृत्युदर कमी करणे.
संसर्गजन्य रोग व साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवणे.
भारतात आरोग्य सेवा पध्दती ब्रिटीश राजवटीपासून सुरु झाली. सुरवातीस आरोग्य सेवेची उद्दिष्टे सैनिक व युरोपीयन नागरी नोकरांना सेवा देणे हे होते व साथरोग नियंत्रण उदा.प्लेग, कॉलरा, देवी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने प्राधान्याने कॅन्टोमेंट भागात सुरु केली. ब्रिटीश राजवटी पाश्चात पध्दतीचे औषधोपचार सुरु केल्यामूळे अस्तित्वात असलेल्या पारंपारिक औषधोपचार व आयुर्वेदिक उपचार याकडे दुर्लक्ष झाले. सुरवातील मोठया शहरात हॉस्पिटल व दवाखाने यांच्यामार्फत उपचारात्मक सेवा देणे सुरु केले. नियोजन समितीने 1940 साली ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणेची सूचना केली व 1000 लोकसंख्येला 1 आरोग्य सेवक व प्रमाणात आरोग्य सेवकांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र 1942 साली कलकत्याजवळ (पश्चिम बंगाल) शिंगुर या गावी सुरु केले. त्याला ग्रामीण आरोग्य पथक असे संबोधण्यात आले. ग्रामीण आरोग्य सेवा डॉ.जेम्स ग्रॅड, संचालक, अखिल भारतीय स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविला आहे. त्याचसुमारास मुंबई प्रांत सरकारच्या आर्थिक सहाय्याने आरोग्य सेवा पदध्ती महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे दवाखाने राज्यात सोयीच्या ठिकाणी सुरु करण्यात आले त्यालाच नागरी दवाखाने म्हणत नंतर हे सर्व दवाखाने जिल्हा परिषदेमध्ये वर्ग करण्यात आले. 1977 साली झालेल्या 13 व्या जागतीक आरोग्य परिषदेमध्ये आरोग्य संघटना व त्याचे सभासद देश यांनी समाजाचे आरोग्य एका ठराविक पातळीवर संवादाचे मुख्य उदिदष्ट ठरविले हेच 2000 साली सर्वांना आरोग्य या नावाने प्रसिध्द झाले. या उदिदष्ट पूर्तीसाठी प्राथमिक आरोग्य सेवा हिच गुरुकिल्ली आहे हे स्विकृत करण्यात आले.